ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कोच निवडीबाबत विराट कोहली म्हणतो...

अँटिगा, दि. ३० (वृत्तसंस्था) - अनिल कुंबळेनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या कोचचा पुन्हा एकदा शोध सुरु झाला आहे. कर्णधाराला माझी प्रशिक्षणाची पद्धत आवडत नसल्याचं अनिल कुंबळेनं आपल्या राजीनाम्यात म्हटलं होतं. त्यानंतर बऱ्याच जणांनी कोहलीला लक्ष्य केलं होतं. दरम्यान आता विराट कोहलीनं नव्या कोचच्या निवडीबाबत वक्तव्य केलं आहे.

सध्या रवी शास्त्री हे प्रशिक्षकपदाच्या रेसमध्ये आघाडीवर आहे. कोहली देखील रवी शास्त्रीच्या जवळचा असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे कोहली शास्त्रींच्या पारड्यात वजन टाकण्याची शक्यता आहे.

कोहलीला जेव्हा नव्या कोचबाबत त्याचं मत विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की, ‘वैयक्तिक मी काहीही सांगू शकत नाही. पण एक टीम म्हणून आम्हाला बीसीसीआय याबाबत विचारणा करेल त्यावेळी आम्ही आमचं मत त्यांच्यासमोर मांडू.’ कोहलीनं यावेळी मान्य केलं की, कोच निवडीसाठी स्वत:ची अशी एक प्रक्रिया असते त्यामुळे यात वैयक्तिक मत फारसं महत्वाचं नसतं.

विराट म्हणाला की, ‘ही एक प्रक्रिया आहे ज्यामधून आम्ही नेहमीच जात असतो आणि टीम म्हणून आम्ही त्याचा सन्मानही करतो. आम्ही आमच्या काही सूचना असल्यास बीसीसीआयला देऊ पण सार्वजनिकरित्या काहीही बोलण्यात अर्थ नाही. त्यामुळे याबाबत जेव्हा आम्हाला विचारणा होईल. तेव्हा एक टीम म्हणून आम्ही बीसीसीआयसमोर आमचं मत मांडू.’ असंही कोहली म्हणाला.

सध्या आपलं लक्ष हे फक्त वेस्टइंडिज विरुद्धची मालिका जिंकण्यावर असणार आहे. सध्या कोच निवडीची प्रक्रिया सुरु असून त्यावर बीसीसीआयचं नियंत्रण आहे. त्यामुळे आम्ही इतर कोणत्याही गोष्टीवर लक्ष देत नाही. आगामी सामन्यांसाठी तयारी करणं आणि ही मालिका जिंकणं यालाच आमचं प्राधान्य आहे.’ असं मत कोहलीनं व्यक्त केलं.