ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

धोनीने कर्णधार नसतानाही मोडला अझरुद्दीनचा रेकॉर्ड

मुंबई, दि. १ - तिस-या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत मालिकेमध्ये - ची आघाडी घेतली आहे. भारताने ९३ धावांनी वेस्ट इंडिजचा पराभव केला. महेंद्रसिंह धोनीने भारताच्या या विजयात महत्वाचा वाटा उचलला. धोनीने भारताच्या विजयासोबतच नव्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. वेस्ट इंडिजविरोधात ७८ धावांची खेळी करणा-या धोनीने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले आहे.

धोनीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जास्त धावा करणा-या खेळाडूंच्या यादीत अझरुद्दीनला मागे टाकले आहे. चौथ्या क्रमांकावर धोनीने झेप घेतली असून अझरुद्दीनचा रेकॉर्ड मोडला आहे. ३३४ एकदिवसीय सामने खेळताना मोहम्मद अझरुद्दीनने ३०८ खेळींमध्ये एकूण ९३७८ धावा केल्या आहेत. तर धोनीने आतापर्यंत २९४ एकदिवसीय सामन्यांत २५४ खेळींमध्ये ५१.३१च्या सरासरीने ९४४२ धावा केल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सर्वाधिक धावा करणा-यांच्या यादीत सर्वात पुढे आहे. सचिन तेंडूलकरने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये एकूण १८४२६ धावा केल्या आहेत.