ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

धोनीचा लाजिरवाणा विक्रम

नॉर्थ साऊण्ड, दि. ३ (वृत्तसंस्था) - विराट कोहलीच्या टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वन डे सामन्यात ११ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजने या विजयासह स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे.

भारताला १९० धावांचे माफक लक्ष्यही तळाच्या फजंदाजांची उडालेली तारांबळ आणि महेंद्रसिंग धोनीची संथ खेळी यामुळे गाठता आले नाही. विजयासाठी अवघ्या काही धावा अखेरच्या षटकांमध्ये शिल्लक असताना भारताचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. १७८ धावांवर भारत सर्वबाद झाला.

महेंद्रसिंह धोनी सध्या अत्यंत संथ खेळीमुळे टीकेचा धनी बनला आहे. ११४ चेंडूत धोनीने ५४ धावा केल्या. यामध्ये केवळ एका चौकाराचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे धोनीने आपला हा एकमेव चौकार १०३ चेंडूनंतर मारला. एवढे चेंडू वाया घालवूनही धोनी मॅच जिंकून देईल अशी आशा होती, मात्र तो शेवटच्या षटकाच्या आधीच बाद झाला. मॅचविनिंग खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीने कालच्या सामन्यात अर्धशतक पूर्ण करण्यासाठी तब्बल १०८ चेंडू खेळले. भारतीय खेळाडूने केलेले हे दुसरे सर्वात संथ अर्धशतक आहे. यापूर्वी सदागोपन रमेशने १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात २०० चेंडूत ८२ धावा केल्या होत्या. याशिवाय माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही एका सामन्यात १०५ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.