ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

टीम इंडियाचा नवा कोच असणार जगातील श्रीमंत कोच

मुंबई, दि. ५ - टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाचा अनिल कुंबळे याने राजीनामा दिल्यानंतर नवीन कोचच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे तसेच या पदासाठी कोणाची निवड होणार याचे अंदाजही वर्तविले जाऊ लागले आहेत. कोच कोण होणार हे लवकरच ठरेल पण एक गोष्ट मात्र आत्ताच स्पष्ट झाली आहे ती म्हणजे टीम इंडियाचा नवा कोच जगात सर्वाधिक मानधन घेणारा कोच ठरणार आहे. टीम इंडिया कोचला वर्षाला कोटी रूपये म्हणजे दररोज लाख रूपये पगार दिला जाणार आहे.

टीम इंडिया कोचच्या स्पर्धेत रवि शास्त्री यांचे नांव आघाडीवर आहे. मात्र त्यांच्या स्पर्धेत विरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, लालचंद राजपूत, रिचर्ड पायबर, डोडा गणेश, सिमन्स यांनीही अर्ज दाखल केले आहेत. नवीन कोचवर टीम इंडियाला केवळ प्रशिक्षण देण्याची जबाबदारी नसेल तर सर्व खेळाडूंमध्ये समन्वय साधणे त्यातही वरीष्ठ खेळाडूंमध्ये सामंजस्य राखण्याचे कामही करावे लागणार आहे. कप्तान कोहलीच्या मनाप्रमाणे निर्णय घेणेही नव्या कोचला अनेकदा भाग पडेल असाही अंदाज वर्तविला जात आहे. कोचचा दोन वर्षांचा कार्यकाल पुरा करायचा असेल तर नवीन कोचला कोहलीची मर्जी सांभाळण्याचे मुख्य काम करावे लागेल अशीही चर्चा आहे.