ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बॅडमिंटन डबल्सला अच्छे दिन दाखविणार ज्वाला

हैदराबाद, दि. ६ (वृत्तसंस्था) - बॅडमिंटनमध्ये एकेरी खेळात भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करीत आहेत. दुहेरी मात्र कायमच उपेक्षित राहिली आहे. आपल्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत दुहेरी बॅडमिंटनलाअच्छे दिनदाखविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू; अशी ग्वाही आंतरराष्ट्रीय ख्यातीची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने दिली. देशात उत्तम बॅडमिंटन खेळाडूंच्या किमान जोड्या घडविण्याचे आपले ध्येय असल्याचे तिने सांगितले.

भारतीय बॅडमिंटन संघटनेने महिलांच्या दुहेरी बॅडमिंटन संघाच्या प्रशिक्षकपदी नुकतीच ज्वालाची निवड केली आहे. ज्वालाने सन २०११ च्या वर्ल्ड चॅंपियनशिप स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले आहे.

भारतात दुहेरी बॅडमिंटन कायमच उपेक्षित राहिले आहे. दुहेरी खेळाडूंना आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध होत नाही. प्रायोजक मिळत नाहीत. प्रोत्साहन आणि प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळे उदयोन्मुख बॅडमिंटन खेळाडूंचा ओढा साहजिकच एकेरीकडे अधिक आहे; याकडे ज्वालाने लक्ष वेधले. या पार्श्वभूमीवर खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देण्याबरोबरच दुहेरी बॅडमिंटनबाबत लोकांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये जागृती निर्माण करणे; दुहेरीबाबत रस निर्माण करणे हे आपले उद्दिष्ट असेल; असेही तिने स्पष्ट केले.

भारतीय बॅडमिंटन संघटनेचे नवे व्यवस्थापन दुहेरीबाबत सकारात्मक आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्याला ही संधी प्रदान केली आहे. त्याचे आपल्याला समाधान आहे. संघटनेचे अध्यक्ष हिमांता बिस्वा सर्मा यांचा दृष्टीकोन सर्वसमावेशक आहे. त्यामुळे भारतीय बॅडमिंटनचे; विशेषत: दुहेरीचे चित्र बदललेले दिसू शकेल; असा विश्वास ज्वालाने व्यक्त केला.