ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अजिंक्यला पहिल्यांदाच मिळाला प्लेअर ऑफ द सीरीज सन्मान

नवी दिल्ली, दि. ८ (वृत्तसंस्था) - अजिंक्य रहाणेकडे टीम इंडियातील भरवशाचा फलंदाज म्हणून पाहिले जाते. अजिंक्य शांत पण तितकाच दमदार खेळ करत आला आहे. त्याने अनेकदा टीमला विजयासाठी मोठे योगदान दिले आहे. आता पहिल्यांदाच एक सन्मान अजिंक्य रहाणेला मिळाला आहे. अजिंक्य रहाणेचा खेळ वेस्ट इंडिज दौ-यात फारच बहरला आहे. पाचही सामन्यात फटकेबाजी करत त्याने ३३६ धावा जमवल्यामुळे त्याला प्लेअर ऑफ सीरीजने गौरवण्यात आले आहे.

२०११ मध्ये मुंबईकर अजिंक्य रहाणे याने एकदिवसीय सामन्यात करिअरला सुरूवात केली. तो टीम इंडियासाठी गेली सात वर्ष खेळतो आहे. त्याने अनेक सामन्यांमधून त्याचा खेळ सिद्ध केला आहे. पण त्याला गेल्या सात वर्षात कधीही प्लेअर ऑफ सीरीज हा सन्मान मिळाला नव्हता. पण आता तो त्याने मिळवला आहे. वेस्ट इंडिज विरूद्ध त्याने एक शानदार शतक तर तीन अर्धशतके झळकवत ३३६ धावा काढले आहेत. मिळालेल्या संधीचे त्याने नेहमीच सोने केले आहे.