ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आज संध्याकाळपर्यंत प्रशिक्षकाचे नाव जाहीर करा

नवी दिल्ली, दि. ११ (वृत्तसंस्था) - अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे लागले आहे. काल क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सौरव गांगुली यांनी कर्णधार विराट कोहली भारतात आल्यानंतर त्याच्याशी चर्चा करुन प्रशिक्षकाचा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते.

पण आता यामध्ये नवा ट्विस्ट आला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या बीसीसीआयच्या प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी प्रशिक्षकाचे नाव आज (मंगळवार) संध्याकाळपर्यंत जाहीर करा, असे आदेश दिल्याचे वृत्त स्टार स्पोर्ट्सने दिले आहे. क्रिकेट सल्लागार समिती म्हणजे सीएसी, ज्यामध्ये सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे. या सीएसीला आज संध्याकाळपर्यंत नाव घोषित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री, टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवाग, इंग्लंडचे क्रिकेटर रिचर्ड पायबस, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि श्रीलंकेचे माजी कोच टॉम मुडी आणि सध्याचे अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे कोच लालचंद राजपूत यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.