ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विराट कोहलीच्या संघात ‘दि बेस्ट’ची क्षमता - शास्त्री

नवी दिल्ली, दि. १ (वृत्तसंस्थ) - विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा विद्यमान संघ कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या आतापर्यंतच्या सर्व संघांच्या तुलनेत सर्वोत्तम संघ ठरू शकतो, असे भाकीत टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी दुसऱ्यांदा नियुक्त झालेल्या रवी शास्त्री यांनी व्यक्त केले

२०१४ ते २०१६ या काळात शास्त्री अगोदर संघ संचालक आणि त्यानंतर प्रशिक्षक राहिलेले आहेत. आता २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत त्यांची पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. शास्त्री हे सध्या लंडनला असून तेथून मुलाखत देताना त्यांनी विराट कोहलीचा हा संघ परदेशांतही यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

आतापर्यंतचा हा सर्वोत्तम संघ आहे. या संघाबरोबर काम करणे हे भाग्य आहे. या संघात असलेला वेगवान मारा कोणत्याही वातावरणात यशस्वी ठरू शकतो. सर्व खेळाडू तरुण आहेत. योग्य वयात त्यांना ही संधी मिळत आहे, असे शास्त्री यांनी म्हटले आहे. कोहली-कुंबळे वादानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणे किती कठीण असेल, या प्रश्नावर शास्त्री यांनी मी आव्हान स्वीकारण्यास तयार आहे, असे उत्तर दिले. मी नेहमीच आव्हानाचा सामना करण्यास सज्ज असतो.