ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सचिन, गांगुली, लक्ष्मण रवी शास्त्रींवर नाराज

मुंबई, दि. १४ - भारतीय क्रिकेट आणि प्रशिक्षक निवडीवरुन सुरु झालेलं वादळ काही केल्या शमायला तयार नसल्याचं चित्र आहे. विराट कोहलीअनिल कुंबळे वाद, त्यानंतर रवी शास्त्रींची प्रशिक्षकपदी नियुक्ती, मग रवी शास्त्रींनी, झहीर खानच्या गोलंदाजी प्रशिक्षकाला केलेला विरोध अशी वादाची मालिका सुरु आहे. त्यातच आता क्रिकेट सल्लागार समिती अर्थात सीएससीचे सदस्य सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने क्रिकेट प्रशासकीय समिती प्रमुख (सीओए) विनोद राय यांना -मेल केला आहे.

या तिघांनी प्रशिक्षक निवड प्रक्रिया, आरोप आणि त्यावरुन होत असलेलात्रासयाबाबत आपलं म्हणणं मांडलं आहे. फलंदाजी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि गोलंदाजी प्रशिक्षक झहीर खान हे रवी शास्त्रींवर थोपवण्यात आल्याचं पसरवलं जात आहेयालाच तेंडुलकर, गांगुली आणि लक्ष्मणने आक्षेप घेत दु: व्यक्त केलं आहे.

सीओएने सीएससीला केवळ मुख्य प्रशिक्षक नियुक्तीचे अधिकार दिले होते. फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक नियुक्ती ही त्यांच्या अधिकार क्षेत्रात नसल्याचं सांगितलं जात आहे किंबहुना तसं पसरवलं जात असल्याचं या त्रिमूर्तींचं म्हणणं आहे.

आम्ही रवी शास्त्रीसोबत द्रविड आणि झहीर खानच्या नावाबाबत चर्चा केली होती. त्यावेळी रवी शास्त्रींनी या नावांना सहमती दर्शवली होती. भारतीय क्रिकेटला सर्वोत्तम कसं करता येईल, त्यासाठीच ही चर्चा झाली. शास्त्रींच्या सहमतीनंतरच द्रविड आणि झहीरच्या नावाला अनुमोदन देण्यात आले, असं या -मेलमध्ये म्हटलं आहे.

तेंडुलकर, गांगुली आणि लक्ष्मणकडून संयुक्तरित्या हा -मेल पाठवल्याचं सांगण्यात येत आहे.

याशिवाय या -मेलमध्ये असंही म्हटलंय की, “असे संकेत दिले जात आहेत की झहीर आणि द्रविडची नियुक्ती ही आमच्या अधिकार क्षेत्रात नाही. अधिकार मर्यादा ओलांडून झहीर आणि द्रविडला थोपवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र आम्ही विनोद राय, राहुल जौहरी आणि अमिताभ चौधरी या सर्वांना बैठकीत काय झालं याबाबतची माहिती दिली होती.

आपल्याला माहित असेलच की आम्ही या प्रक्रियेत भारतीय संघाचं भलं कसं होईल, याच विचाराने जीव लावून काम करत आहोत. भारतीय संघाला जगात दबदबा कसा राखता येईल, विश्वचषक कसा जिंकता येईल हाच आमचा उद्देश आहे.

आमची छबी खराब करुन, मीडियात जाणीवपूर्वक आमच्याबद्दलचं Posted On: 14 July 2017