ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

द्रविड श्रीलंका दौऱ्यावर रवी शास्त्रींसोबत जाणार नाही

नवी दिल्ली, दि. १७ (वृत्तसंसा) - राहुल द्रविडची टीम इंडियाच्या परदेशातील कसोटी दौऱ्यांसाठी फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र द्रविड नवनियुक्त प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत श्रीलंका दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर परदेशातील कसोटी दौऱ्यांसाठी फलंदाजी सल्लागार म्हणून राहुल द्रविड आणि गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीर खानची नियुक्ती करण्यात आली आहे.

राहुल द्रविडची नुकतीच पुन्हा एकदा भारतीय संघ आणि अंडर १९ संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघ ऑगस्टमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाईल. त्यामुळे द्रविडलाही भारतीय संघासोबत जावं लागणार असल्याने श्रीलंका दौऱ्यावर जाता येणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान गोलंदाजी सल्लागार झहीर खान कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाला मार्गदर्शन करण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. द्रविड टीम इंडियासोबत प्रत्येक परदेश दौऱ्यावर जाईलच असं नाही. जेव्हा त्याची गरज असेल तेव्हा बोलवलं जाईल. कारण टीम इंडियाचा फलंदाजी सल्लागार म्हणून कोणताही वेगळा करार द्रविडशी करण्यात आलेला नाही, असंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

श्रीलंका दौऱ्यातील पहिला कसोटी सामना २६ जुलै रोजी खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सराव सामना होणार नसल्याचीही माहिती आहे. दुसरा कसोटी सामना ते ऑगस्ट आणि तिसरा कसोटी सामना १२ ते १६ऑगस्ट या काळात खेळवला जाणार आहे.

वन डे मालिकेची सुरुवात २० ऑगस्ट रोजी दंबुलाच्या मैदानातून होणार आहे. दुसरा आणि तिसरा वन डे अनुक्रमे २४ आणि २७ ऑगस्टला खेळवला जाईल. तर चौथा आणि पाचवा वन डे खेट्टाराम इथे खेळवला जाणार आहे. याच मैदानावर एकमेव टी-२० सामनाही खेळवला जाईल.

श्रीलंकेचा संघ यापूर्वी २०१५ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आला होता. टीम इंडिया जवळपास एका वर्षानंतर परदेशात पहिला कसोटी सामना खेळणार आहे. भारताने परदेशात अखेरचा कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. टीम इंडिया या दौऱ्यावर नव्या मुख्य प्रशिक्षकासोबत जाणार आहे.