ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दोन वेळेस मॅगी खाऊन भूक मिटवत होता हार्दिक पांड्या

नवी दिल्ली, दि. १ (वृत्तसंस्था) - सध्या मीडियात आणि सोशल मीडियात टीम इंडियातील ऑल राऊंडर अशा या क्रिकेटरचा बोलबाला असल्याचे पहायला मिळत आहे. आजच्या घडीला हा क्रिकेटर जारी कोट्यावधी रुपयांची कमाई करत असला तरी कधीकाळी त्याला दोन वेळ खाण्यासाठी अन्न ही मिळत नसे.

हार्दिक पांड्या असे या क्रिकेटरचे नाव असून हार्दिक पांड्या हा सध्याच्या परिस्थितीत टीम इंडियातील एक आघाडीचा ऑल राउंडर खेळाडू आहे. टीम इंडियाचा रॉकस्टार म्हणूनही हार्दिकला म्हटले जाते. हार्दिक पांड्याने गेल्या दोन वर्षांमध्ये इतकी प्रसिद्धी आणि पैसा कमविला आहे जे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण हाच हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कुणाल केवळ मॅगी खाऊन दिवस काढायचे हे तुम्हाला माहिती आहे का?

याबाबतचे वृत्त फर्स्टपोस्टने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका मुलाखतीत हार्दिक पांड्याने सांगितले होते की त्यांचा क्रिकेट खेळण्याचा कोणताही प्लॅन नव्हता. क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड त्याच्या मोठ्या भावाला होती आणि त्याच्यासोबत हार्दिकही मैदानात जात असे. त्याचवेळेस कोच किरण मोरे यांनी हार्दिक पांड्याला मजामस्ती करताना पाहिले आणि त्याला म्हटले की, तुलाही तुझ्या भावाप्रमाणे क्रिकेट खेळायला हवे.

किरण मोरे यांनी त्यानंतर हार्दिकच्या वडिलांसोबत संपर्क साधला आणि सांगितले की, तुमच्या मुलांना क्रिकेटर बनवायचे असेल तर वडोद-याला शिफ्ट व्हा. सुरतमध्ये क्रिकेट कल्चर नाही. हार्दिकने यानंतर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि आता तो टीम इंडियाचा एक सदस्य आहे.

हार्दिकचे वडिल १९९९मध्ये कोच किरण मोरे यांनी वडोद-याला शिफ्ट होण्याचा सल्ला दिल्यानंतर सुरतहून वडोद-याला शिफ्ट झाले. सुरतमध्ये त्याचे वडिल लहान मोठे काम करत असत. तर कार फायनान्स कंपनीतही पार्ट टाईम जॉब करत होते. हार्दिकच्या वडिलांची उत्पन्न एवढे कमी होते की त्यामध्ये त्यांचे घर चालविणे खूप जिकरीचे होते.

हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ आर्थिक परिस्थिती खडतर असल्याने केवळ मॅगी खाऊन संपूर्ण दिवस राहत होते. पण आपला सराव त्यांनी सोडला नाही. आर्थिक परिस्थिती खराब असल्याने मैदानात फिट राहण्यासाठी