ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

भारतीय खेळाडूने ठोकले क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद शतक

बंगळुरु, दि. २ (वृत्तसंस्था) - क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्यात नेहमीच नवनवीन विक्रम बनत असतात आणि मोडत असतात. आता अशाच प्रकारचा नवा विक्रम रचला गेला आहे. तो देखील आंध्र प्रदेशच्या एका फलंदाजांने रचला आहे. चक्क २८ चेंडूमध्ये त्याने शतक झळकावत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

हा विक्रम कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन टूर्नामेंटमधील ग्रुप च्या सामन्यामध्ये झाल्याचे पहायला मिळाले. सिटी जिमखाना क्लबतर्फे खेळताना आंध्र प्रदेशातील पाल प्रोलू रविंद्र याने अवघ्या २८ चेंडूत शतक झळकावले आहे. त्याने शनिवारी झालेल्या मॅचमध्ये झळकावलेले हे शतक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठरले आहे.

आपल्या इनिंगमध्ये रविंद्रने ५८ चेंडूमध्ये १४४ धावा बनविल्या. त्याने या इनिंगमध्ये १३ षटकार आणि चौकार मारले. रविंद्रने केलेल्या या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर सिटी जिमखानाच्या संघाने गडी गमावत ४०३ धावा केल्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या जयदूर क्लबचा संपूर्ण संघ २२९ धावांवर बाद झाला.

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील २७ वर्षाचा रवींद्र आहे. त्याचा भाऊ वासू हा भारतीय सैन्यदलात आहे. रवींद्र वर्षापूर्वी क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी बंगळुरुला आला. रविंद्रने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, तो टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग याला आपला आदर्श मानतो.