ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मिताली राजला मिळाली बीएमडब्ल्यू डी ३२० कार भेट

हैदराबाद, दि. ३ (वृत्तसंस्था) - तेलंगणा बॅडमिंटन संघाचे उपाध्यक्ष व्ही चामुंडेश्वरनाथ यांनी महिला क्रिकेट वन डे मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारी भारताच्या महिला टीमची कप्तान मिताली राज हिला बुधवारी नवी २०१७ बीएमडब्ल्यू डी ३२० ही कार भेट म्हणून दिली आहे. या कारची बाजारातील किंमत ३६.३० ते ४४ लाख रूपयांदरम्यान आहे.

या अपडेटेड कारला फुल एलईडी हेडलँप क्लस्टर, एलईडी फॉग रिव्हाईज्ड, एलईडी डेटाईम रनिंग लाईटस दिले गेले आहेत. ते १०० किमीचा वेग ती . सेकंदात घेते तिचा टॉप स्पीड आहे ताशी २३० किमी. कारमध्ये हेडसअप डिस्प्ले थ्रीडी ग्राफिक्ससह दिला गेला आहे तसेच त्याला पार्क असिस्ट फिचर, नवीन नॅव्हीगेशन सिस्टीम दिली असून ती पाच ड्रायव्हिंग मोड मध्ये आहे. कारचे मायलेज लिटरला २२.६९ किमी असल्याचा कंपनीचा दावा आहे.