ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रहाणे, पुजाराच्या शतकांच्या जोरावर भारताच्या ३४४ धावा

कोलंबो, दि. ४ (वृत्तसंस्था) - आज सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये शानदार फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने रहाणे आणि पुजाराच्या शतकी खेळीच्या बळावर ३४४ धावांचा डोंगर उभा केला. चेतेश्वर पुजाराने गॉल कसोटीप्रमाणे दुसऱ्या कसोटीतही शतकी खेळी केली. भारताने पुजाराच्या खेळीच्या बळावर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाखेर तीन बाद ३४४ धावांचा डोंगर उभा केला. पुजाराला मुंबईकर अजिंक्य रहाणेने चांगली साथ दिली. १५४ चेंडूत रहाणे देखील आपले शतक साजरे केले. दिवसाखेर रहाणे १०३ धावांवर खेळत होता. चौथ्या विकेटसाठी पुजारा-रहाणे जोडीने द्विशतकी भागीदारी केली.

कोलंबो कसोटीत भारताने पुजारा-रहाणेच्या खेळीमुळे आपली पकड मजबूत केली आहे. १६५ चेंडुत पुजाराने १०० धावा काढल्या. दिवसाखेर पुजारा १२८ धावांवर नाबाद आहे. आतापर्यंत त्याच्या खेळीत १० चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. चेतेश्वरने यादरम्यान कसोटीमध्ये हजार धावांचा टप्पाही पार केला. आपल्या कसोटी कारकिर्दीतला पुजाराचा हा ५० वा सामना आहे, त्यातच आज पुजाराच्या नावाची मानाच्या अर्जुन पुरस्काराठी शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोलंबो कसोटीत चेतेश्वर पुजासाठी एक अनोखा त्रिवेणी संगम जुळून आल्याचे पहायला मिळले.

भारताने दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. लोकेश राहुलने दमदार पुनरागमन करताना अर्धशतकी खेळी केली. तो (५७) धावांवर धावबाद झाला. हेरथच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या नादात राहुल आणि पुजारामध्ये झालेल्या गडबडीमुळे, राहुल धावचीत झाला. आज कर्णधार विराट कोहलीला सूर गवसला नाही. त्याला हेराथने मॅथ्यूजकरवी झेलबाद केले. सलामीवीर शिखर धवन (३५) धावांवर बाद झाला. त्याला परेराने पायचीत केले. शिखर धवन आणि लोकेश राहुलने चांगली सुरुवात केली होती. श्रीलंकेकडून दिलरुवान पेरेरा आणि रंगना हेरथ यांनी प्रत्येकी - बळी घेतला.