ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकणाऱ्या यादीत टीम इंडिया

कोलंबो, दि. ७ (वृत्तसंस्था) - कोलंबो कसोटी वाचवण्यासाठी दुसऱ्या डावात श्रीलंकेने केलेला कठोर संघर्ष अयशस्वी ठरला. श्रीलंकेचा दुसरा डाव टीम इंडियाने ३८६ धावांत रोखून, कोलंबो कसोटीत एक डाव आणि ५३ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. या दरम्यान भारतीय संघाने या कसोटी विजयासोबत आणखी मोठ्या विक्रमाची नोंद केली असून भारताने सलग जास्त वेळा कसोटी मालिका जिंकणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

सर्वाधिक वेळा सलग कसोटी मालिका जिंकणाऱ्या देशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड भारताच्या पुढे आहेत. इंग्लंडने १८८४ ते १८९८ या काळात सलग कसोटी मालिका जिंकल्या. त्यानंतर जवळपास ११६ वर्षांनी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या या विक्रमाची बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाने रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात २००५-०६ ते २००८ या काळात सलग कसोटी मालिकांवर आपले नाव कोरले आहे.

आता भारताने १२५ वर्षांनंतर सलग कसोटी मालिका जिंकून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारतीय संघ २०१५ मध्ये श्रीलंका दौऱ्यावरुन या विजय रथावर स्वार झाला. त्यानतंर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि आता पुन्हा श्रीलंकेला भारताने पराभवाची धूळ चारली. या सर्व कसोटी मालिका भारताने कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात जिंकल्या आहेत.