ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अरविंद डिसिल्व्हाला पडली विराटची भुरळ

कोलंबो, दि. ८ (वृत्तसंस्था) - आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या दमदार खेळाने प्रभावित झालेले बघायला मिळतात. हे महान खेळाडू वेळोवेळी विराटच्या आक्रमकतेचे कौतुक करत असतात. असाच एक दिग्गज खेळाडू आता पुन्हा विराट कौतुक करताना थकत नाही. श्रीलंकेचे महान क्रिकेटपटू अरविंद डिसिल्व्हा यांचा विराटचे कौतुक करणा-या महान खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे.

रविवारी भारत-श्रीलंका कसोटी सामन्याच्यावेळी मैदानावर प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या अरविंद डिसिल्व्हा यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना विराटचे कौतुक केले. ‘विराटला मैदानावर खेळताना पाहून मला वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्सची आठवण होते. विराट ज्या प्रकारे क्रिकेट खेळतो त्याचा उद्दामपणा, आत्मविश्वास पाहून मला महान क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स हे आठवतात.

कोहली ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियन संघाला सामोरा गेला ते कौतुकास्पद आहे. भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा सुनिल गावसकर, कपिल देव त्यानंतर सचिन तेंडुलकर यांनी बदलला आता कोहली त्याच्या काळात भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जाईल असा विश्वास डिसिल्व्हा यांनी व्यक्त केला.