ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तिसऱ्या कसोटीत जडेजाची जागा घेणार अक्षर पटेल

कोलंबो, दि. ११ (वृत्तसंस्था) - फिरकीपटू अक्षर पटेलचा श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या कसोटीसाठी ऑल राऊंडर रवींद्र जडेजाचे निलंबन करण्यात आल्याने अक्षर पटेलला त्याच्या जागी संधी देण्यात आली.

कोलंबो कसोटीतील अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर किताबाचा मानकरी ठरलेल्या रवींद्र जडेजावर त्याच कसोटीतील अखिलाडूवृत्तीसाठी आयसीसीने एका कसोटीच्या निलंबनाची कारवाई केली आहे. श्रीलंका दौऱ्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत जडेजाला या कारवाईमुळे खेळता येणार नाही. कोलंबो कसोटीत जडेजाने स्वत:च्या गोलंदाजीवर अडवलेला चेंडू फलंदाज करुणारत्नेच्या दिशेने अतिशय धोकादायक पद्धतीने थ्रो केला होता.

आयसीसीच्या आचारसंहितेचे या प्रकरणात उल्लंघन केल्यामुळे जडेजाला तीन दंड गुण आणि कसोटी मानधनाच्या ५० टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. पण गेल्या २४ महिन्यांत जडेजाच्या बेशिस्त वर्तनासाठीच्या एकूण दंड गुणांची संख्या सहावर गेली. त्यामुळे आयसीसीच्या नियमावलीनुसार त्याच्यावर एका कसोटीतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.