ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

टीम इंडियाने श्रीलंकेत फोडली विजयाची हंडी

कॅण्डी, दि. १४ (वृत्तसंस्था) - गॉल आणि कोलंबो कसोटी सामन्यांपाठोपाठ विराट कोहलीच्या टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यातील कॅण्डी कसोटीही जिंकत विजयाची हंडी फोडली आहे. श्रीलंकेचा दुसरा डाव भारताने १८१ धावांत गुंडाळून, कॅण्डीच्या तिसऱ्या कसोटीत एक डाव आणि १७१ धावांनी विजय साजरा केला.

या विजयासह भारताने तीन कसोटी सामन्यांची मालिका - अशी जिंकली आहे. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या ८५ वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाने परदेशात क्लीन स्विप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, शिखर धवन, हार्दिक पंड्या यांच्या दमदार शतकामुळे भारताने जबरदस्त खेळी करत पहिल्या डावात ४८७ धावांची मजल मारली होती. त्यानंतर टीम इंडियाने श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या १३५ धावांत गुंडाळून, यजमानांवर फॉलोऑन लादला. त्यामुळे भारताकडे तब्बल ३५२ धावांची आघाडी होती. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एक बाद १९ धावांवरुन सुरुवात करणाऱ्या श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या १८१ धावांवर आटोपला. भारताकडून आर अश्विनने मोहम्मद शमीने , उमेश यादवने तर कुलदीप यादवने एक गडी बाद केला.