ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

टीम इंडियाने केले श्रीलंकेत ध्वजारोहण

पल्लीकेले, दि. १६ (वृत्तसंस्था) - श्रीलंकेत मंगळवारी टीम इंडियाने देशाचा ७०वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी या वेळी ध्वजारोहण केले. टीम इंडियाने या वेळी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीतही गायले गेले. कोहलीसह भारताच्या सर्व खेळाडूंनी या वेळी तिरंग्याला मानवंदना दिली. या वेळी कोहलीने देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. त्याचबरोबर माझ्या वडिलांचा वाढदिवसही १५ ऑगस्टला असल्यामुळे माझ्यासाठी हा दिवस खास असल्याचे कोहली म्हणाला.

कोहलीने या वेळी आपल्या लहानपणाच्या आठवणींनाही या वेळी उजाळा दिल्या. तो म्हणाला, मी आणि माझे मित्र लहानपणी माझ्या कुटुंबीयांबरोबर पतंग उडवायचो. त्याचबरोबर सर्वत्र तिंरगा फडकताना पाहिला की आनंद होतो. भारतीय असल्याचा अभिमान तर मला आहेच आणि तो कायम राहील.