ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

बंदी हटवल्यानंतर श्रीशांतचे मैदानावर पुनरागमन

कोच्ची, दि. १६ (वृत्तसंस्था) - तब्बल वर्षानंतर क्रिकेटर एस. श्रीशांतवर फिक्सिंगप्रकरणी घालण्यात आलेली बंदी हटवण्यात आल्यानंतर श्रीशांतने काल (मंगळवार) मैदानावर पुनरागमन केले. एका प्रदर्शनीय सामन्यात श्रीशांत खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. स्टेडिअमधील प्रेक्षकांनी त्याचे मैदान येताच जोरदार स्वागत केले. काही दिवसांपूर्वीच श्रीशांतवरील बंदी हटवण्याचे आदेश बीसीसीआयला केरळ उच्च न्यायालयाने दिले होते.

१७ मे २०१३ साली मुंबईतून श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. काही दिवस श्रीशांतची रवानगी तिहार जेलमध्येही करण्यात आली होती. काल (मंगळवारी) प्रोड्यूसर इलेव्हन वि. प्लेबॅक सिंगर इलेव्हन या दोन संघामध्ये सामना पार पडला. प्लेबॅक सिंगर इलेव्हन संघात श्रीशांतचा समावेश होता. या सामन्यात श्रीशांतने फलंदाजीने सुरुवात केली. या सामन्यानंतर बोलताना श्रीशांत म्हणाला की, मैदानावर परतल्याने मला खूप आनंद झाला आहे. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन.