ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

असा असेल भारत दौऱ्यावर येणारा ऑस्ट्रेलियन संघ

नवी दिल्ली, दि. १९ (वृत्तसंस्था) - १७ सप्टेंबरपासून भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघ येणार असून या दौऱ्यात ऑस्ट्रेलियन संघ एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार असल्याची घोषणा ऑस्ट्रेलियन बोर्डाने केली आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियन संघ स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणार असून या संघात अष्टपैलू फॉकनरला स्थान देण्यात आले आहे तर दुखापतग्रस्त मिशेल स्टार्कला विश्रांती देण्यात आली आहे.

फॉकनरला इंग्लंडमध्ये खेळवल्या गेलेल्या चॅम्पियन्स चषकातील ऑस्ट्रेलियन संघात संधी मिळाली नव्हती. तो भारत दौऱ्यातून संघात पुनरागमन करतो आहे. स्टिव्ह स्मिथकडेच एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही प्रकाराच्या कर्णधार पदाची सूत्र देण्यात आली आहे. हेजलवूडला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले असले तरी टी २० संघापासून त्याला दूर ठेवण्यात आले आहे.

भारत दौऱ्यावर येणारा ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघस्टिव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अॅरॉन फिंच, ग्लॅन मॅक्सवेल, मार्कस स्टोएनेस, ट्रेविस हेड, मॅथ्थू वेड, नॅथन कुल्टर नाइल, पॅट केमिन्स, जेम्स फॉकनर, जोश हेजलवूड, अॅस्टन अॅगर, हिल्टन कार्टवाइट, अॅडम झॅम्पा, मोजिस हेनरीकेज.

टी-२०साठीचा ऑस्ट्रेलियन संघस्टिव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जेसन,डेन क्रिस्टन, नॅथन कुल्टर नाइल, पॅट केमिन्स, अॅरॉन फिंच, ट्रेविस हेड, मोजिस हेनरीकेज, ग्लॅन मॅक्सवेल, टिम पाइन, अॅडम झॅम्पा, केन रिचर्डसन.