ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाक सुपरलिग मध्ये खेळणार चीनी क्रिकेटपटू

कराची, दि. २१ (वृत्तसंस्था) - पुढच्या वर्षी होत असलेल्या पाकिस्तान सुपरलिग मध्ये पेशावर झल्मी या टीमकडून चीनचे नॅशनल क्रिकेट टीममधील दोन खेळाडू खेळणार असल्याची बातमी पाक न्यूज एजन्सी एपीपी ने दिली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पेशावर झल्मी टीमचे प्रमुख जावेद आफ्रिदी बिजिंगला पुढच्या महिन्यात भेट देत आहेत त्यावेळी या खेळाडूंबरोबर करार केला जाणार आहे.

चीनकडेही पुरूष महिला क्रिकेट टीम आहेत आणि त्यांनी कांही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धातून भागही घेतलेला आहे. मात्र लक्षात येण्याजोगी कामगिरी त्यांना बजावता आलेली नाही. चीनने पाकिस्तान क्रीकेट कंट्रोल बोर्डाकडे या मॅचेस साठी त्रयस्थ ठिकाण म्हणून चीनचा विचार केला जावा असाही प्रस्ताव ठेवला आहे. पाकिस्तानात सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय टीमनी नकार दिल्याने या मॅचेस यूएई वा अन्य देशांत खेळल्या जातात.

दरम्यान श्रीलंका सप्टेंबरमध्ये आठ वर्षांच्या गॅपनंतर प्रथमच टी २० सामना खेळणार आहे. श्रीलंकेच्या संघावर २००९ साली लाहोर येथे हल्ला झाला होता तेव्हापासून श्रीलंका पाकिस्तानात खेळलेली नाही.