ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुजारा, हरमनप्रीत कौरसह १७ जणांचा होणार अर्जुन पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली, दि. २३ (वृत्तसंस्था) - २०१७चा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधीखेलरत्नपुरस्कार दोन वेळेचा पॅरालिम्पिक सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंग यांना जाहीर करण्यात आला आहे. न्या. सी. के. ठक्कर (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णविजेता असलेला पहिला भारतीय दिव्यांग खेळाडू झांझरिया याच्या नावाला प्रथम पसंती दिली होती. तसेच क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी हरमनप्रीत कौर, गोल्फपटू एस.एस.पी. चौरसिया आणि टेनिसपटू साकेत मैनेने यांच्यासह १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाने सन्मानित करण्यात येणार आहे.

भारतीय क्रीडा क्षेत्रातील राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. तर, क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा अर्जुन पुरस्कार हा र्वात मोठा पुरस्कार मानला जातो. राष्ट्रपतींच्या हस्ते एक पदक आणि एक प्रमाणपत्रासह साडे सात लाख रुपयांची रक्कम राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळणाऱ्या खेळाडूला दिली जाते. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह याने तब्बल १० वर्षे आंतरराष्ट्रीय हॉकीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, सरदार सिंहने आठ वर्षे भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. तर ३५ वर्षीय देवेंद्र झाझरियाने २००४ आणि २०१६च्या पॅरालिम्पिकमध्ये भारताला भालाफेकीच्या दोन सुवर्णपदकांची कमाई करुन दिली आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झालेला देवेंद्र हा पहिलाच पॅरालिम्पिक खेळाडू ठरला आहे.

अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारे खेळाडू : व्ही. जे. सुरेखा (तिरंदाजी, खुशबीर कौर (ॅथलेटिक्स), आरोकिन राजीव (ॅथलेटिक्स), प्रशांतीसिंग (बास्केटबॉल), एल. देवेंद्रोसिंग (बॉक्सिंग), चेतेश्वर पुजारा (क्रिकेट), हरमनप्रीत कौर (क्रिकेट), ओयनाम बेमबेम (फुटबॉल), एसएसपी चौरसिया (गोल्फ), एस. व्ही. सुनील (हॉकी ), जसवीरसिंग (कबड्डी), पी. एन. प्रकाश ( नेमबाजी), . अंमलराज (टेबल टेनिस), साकेत मायनेनी (टेनिस), सत्यव्रत कादियाना (कुस्ती), मणियन थंगावेलू (पॅरा ॅथलिट) आणि वरुण Posted On: 23 August 2017