ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

श्रीलंकेतील उर्वरित सामन्यांमध्ये म्हटले जाणार नाही राष्ट्रगीत

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) - भारत-श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या पुढील सामन्यांमध्ये कोणत्याही देशाचे राष्ट्रगीत म्हटले जाणार नसल्याचे नुकतेच स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय सामन्यांची सुरुवात त्या सामन्यामध्ये सहभागी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत लावून केली जात होती. पण भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये दोन्ही देशांचे राष्ट्रगीत लावण्यात येणार नाही.

दांबुला येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यावेळी राष्ट्रगीत लावण्यात आले होते. पण यापुढील सामन्यांवेळी तसे होणार नाही, असे श्रीलंका संघाचे मीडिया मॅनेजर दिनेश रत्नसिंघम यांनी सांगितले. त्याचबरोबर आम्ही मालिकेतील केवळ पहिल्या सामन्याच्या आधीच राष्ट्रगीत लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकदिवसीय मालिकेनंतर आत सप्टेंबर रोजी कोलंबोच्या प्रेमदास स्टेडियमवर भारत-श्रीलंका यांच्यातील टी-२० सामन्यावेळी राष्ट्रगीत वाजविण्यात येईल.