ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आज खेळवला जाणार बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वात महागडा सामना

मुंबई, दि. २६ - आज फ्लॉईड मेवेदर आणि कोनॉर मॅकग्रेअर यांच्यात बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वात लक्षवेधक आणि महागडा सामना होत असून जगभरातील २०० पेक्षा जास्त देशांमध्ये लासवेगासमधे होणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. चक्क ६०० मिलियन डॉलर म्हणजेच हजार ८३२ कोटींचा सट्टा या सामन्यावर लागला आहे. १०० मिलीयन डॉलर म्हणजेच कोटी ३८ लाखांचे बक्षीस या सामन्याच्या विजेत्याला दिले जाणार आहे.

या सामन्याची घोषणा दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. जगभरातील बॉक्सिंग प्रेमींचे या सामन्याकडे तेव्हापासूनच लक्ष लागून राहिले होते. लास वेगसमधील टी-मोबाइल अॅरेना हे स्टेडियम बॉक्सिंगच्या या महामुकाबल्यासाठी सज्ज झाले असून, या स्टेडियममध्ये हा सामना प्रत्यक्षात पाहण्यासाठी तब्बल २० हजार चाहते उपस्थित राहणार आहेत. या सामन्याचे एक तिकीट जवळजवळ १६ हजार रुपये किंमतीला विकले गेले आहे. हा सामना एकूण १२ राऊंडमध्ये होणार आहे.