ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाय जरी मोडला तरी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेन - धोनी

नवी दिल्ली, दि. २८ (वृत्तसंस्था) - महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा श्रीलंका दौऱ्यावरील दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्वत:ला सिद्ध केले असून भुवनेश्वर कुमारसोबत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चांगली भागीदारी करुन त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तर काल झालेल्या तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या साथीने त्याने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. याच दरम्यान धोनीवर टीका करणारे निवड समितीचे प्रमुख एम. एल. के. प्रसाद यांनी धोनीच्या आशिया दौऱ्यातील आठवणींना उजाळा दिला आहे.

निवड समितीचे प्रमुख एम. एल. के. प्रसाद यांनी आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी धोनी हा आमच्यासमोरचा एकमेव पर्याय नाही, असे वक्तव्य केले होते. यानंतर विश्वचषकात कोणाला संधी द्यायची हा निर्णय घेतला जाईल, असे प्रसाद म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्रसाद यांच्यावर चांगलीच टीका झाली.

पण आता प्रसाद यांनी धोनीच्या आशिया दौऱ्यातील आठवणींना उजाळा दिला आहे. महेंद्रसिंह धोनी आशिया दौऱ्यावेळी पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. त्याचे संघासाठी खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे निवड समिती चिंतेत होती. पाकिस्तानसमोर भारतीय संघ धोनीशिवाय कसा खेळणार? हा प्रश्न सर्वांना सतावत होता. धोनीने त्यावेळी प्रसाद यांना चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. एका कार्यक्रमादरम्यान प्रसाद म्हणाले की, मी जेव्हा धोनीची परिस्थिती पाहण्यासाठी त्याच्याकडे गेलो. त्याने मला त्यावेळी चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर मी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी माझा एक पाय जरी मोडला तरी मैदानात उतरेन, असे धोनी म्हणाला होता.

प्रसाद पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीची धोनीची आठवण सांगताना म्हणाले की, धोनीच्या कंबरेत पाकिस्तानसोबतच्या सामन्यापूर्वी जीममध्ये व्यायाम करताना चमक भरली. वैद्यकीय चमूने धोनीला त्यावेळी स्ट्रेचरवरुन नेले. धोनीची ही दुखापत गंभीर नसली, तरी त्याला खूप वेदना होत होत्या. त्यावेळी त्याला धड चालता देखील येत नव्हते. धोनीच्या खेळण्यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी मला विचारले. पण मी त्यावेळी काहीच सांगू शकलो नाही. पण धोनी मला सामन्याच्या दिवशी पॅड बांधून सराव करताना दिसला.