ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बांगलादेशचा नवा विक्रम, बलाढ्य ऑस्ट्रेलियाला लोळवले

नवी दिल्ली, दि. ३० (वृत्तसंस्था) - कसोटी क्रिकेटमधील एक ऐतिहासिक विजय बांगलादेशने साजरा केला असून बलाढ्य ऑस्ट्रेलियावर बांगलादेशने मिरपूर कसोटीत २० धावांनी मात केली. बांगलादेशने या कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २६५ धावांचे माफक आव्हान दिले होते. पण शकिब अल हसनने ८५ धावांत पाच आणि तैजुल इस्लामने ६० धावांत विकेट्स घेऊन २४४ धावांत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. पहिल्या डावात शकिब अल हसनने ८४ धावांची खेळी आणि दोन्ही डावांत मिळून दहा विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी बजावून, बांगलादेशच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.

तत्पूर्वी पहिल्या डावात ४३ धावांची आघाडी घेणा-या बांगलादेशने दुस-या डावात २२१ धावांची मजल मारली आणि आॅस्ट्रेलियापुढे विजयासाठी २६५ धावांचे आव्हान ठेवले. बांगलादेशच्या दुसºया डावात तमिम इक्बाल (७८), मुशफिकूर रहीम (४१), शब्बीर रहमान (२२) मेहदी हसन (२२) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.

लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाची सुरुवातीला बाद २८ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर वॉर्नर स्मिथ यांनी तिसºया विकेटसाठी ८१ धावांची अभेद्य भागीदारी करीत डाव सावरला. बांगलादेशतर्फे दुस-या डावात मेहदी हसन शाकिब-अल-हसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.