ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकला पाकिस्तानी फलंदाज; ५ वर्षांची बंदी

कराची, दि. ३१ (वृत्तसंस्था) - स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी पीसीबीकडून पाकिस्तानचा फलंदाज शरजील खानवर वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने ही कारवाई त्याच्यावर करण्यात आली आहे.

नियमांचे शरजीलने उल्लघन केल्याने पीसीबीच्या एका समितीने त्याच्यावर ही बंदी घातली. पण त्याची ही शिक्षा टप्प्यांमध्ये असणार आहे. येत्या अडीच वर्षात शरजीलला कोणतेही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळता येणार नाही. पण पीसीबीच्या काही अटी आणि नियमांचे पालन केल्यास तो ३० महिन्यानंतर पुन्हा मैदानात परतू शकेल.

लाहोर उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असगर हैदर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने शरजीलला ही शिक्षा सुनावली. स्पॉट फिक्सिंगमध्ये शरजीलसोबतच खालिद लतीफ याचे देखील नाव समोर आले होते. त्यानंतर या दोघांनाही तत्काळ दुबईहून पाकिस्तानला पाठवण्यात आले होते. शरजील खान पाकिस्तानकडून एक कसोटी, २५ वनडे आणि १५ टी-२० सामने खेळला आहे.