ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

… आणि रोहितने मारली मलिंगाला मिठी

कोलंबो, दि. १ (वृत्तसंस्था) – भारताने श्रीलंकेचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजाच्या अचूक मा-याच्या जोरावर १६८ धावांनी धुव्वा उडवत विजयी चौकार लगावला. भारताने या शानदार विजयासह एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत - अशी आघाडी घेतली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेसमोर ३७६ धावांचे आव्हान ठेवले होते. कर्णधार विराट कोहलीने ७६ चेंडूत दमदार शतक झळकवले. विराट कोहलीची फटकेबाजी शतकानंतर आधिक आक्रमक झाली. पण विराट कोहली बाद झाल्यानंतर प्रेमदासा स्टेडिअमवर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. १३१ धावांवर मलिंगाने विराट कोहलीला मुनावीराकरवी झेलबाद केले. रोहित शर्माने मलिंगाला कोहली बाद झाल्यावर मिठी मारली आणि त्याचे अभिनंदन केले.

आता तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण आम्ही याचे नेमके कारण सांगितल्यावर तुम्ही पण म्हणाल रोहितने बरोबर केले. यामागे नेमके कारण असे की, विराटला मलिंगाने बाद करताच त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ३०० गडी पुर्ण केले. मलिंगा या सामन्यात स्वत: कर्णधार होता. शतकवीर कोहलीला बाद करुन मलिंगाने आपल्या बळींचे त्रिशतक पूर्ण केले. दिग्गज मुथय्या मुरलीधरननंतर (५३४) अशी कामगिरी करणारा तो श्रीलंकेचा दुसरा, तर जगातील एकूण १३ वा गोलंदाज ठरला.

विराटला बाद केल्यावर रोहित शर्मा याने मलिंगाचे अभिनंदन केले. त्यावेळी त्याने मलिंगाला मिठी मारली. हे दृश्य पाहिल्यावर भारतीय प्रेक्षक हैराण झाले की हे काय झाले. पण जेव्हा समजले की मलिंगाने ३०० विकेट घेतल्या त्यानंतर प्रेक्षकांचे कोडे सुटले. त्यानंतर क्रिजवर आलेल्या हार्दिक पांड्यानेही मलिंगाचे अभिनंदन केले.