ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

टेनिसस्टार सेरेना विल्यम्स झाली आई

न्यूयॉर्क, दि. २ (वृत्तसंस्था) - स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून मुलीली जन्म दिल्यानंतर आता पुढील वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपण खेळणार असल्याचे सेरेनानं म्हटले आहे.

सेरेना विल्यम्सने टेनिसच्या इतिहासात अत्यंत तरबेज खेळाडू म्हणून नाव नोंदवले असून २३ ग्रँडस्लॅमसह अनेक विक्रम सेरेनाने आपल्या नावावर केले आहेत. जानेवारी २०१७मध्ये प्रेग्नंट असतानाही ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होत, सेरेनाने ग्रँड स्लॅम जिंकून आपल्या चाहत्यांसह अवघ्या टेनिस जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता.