ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

साईनाचे गोपीचंद अकादमीत पुन्हा प्रशिक्षण सुरू

गेल्या आठवड्यात ग्लासगो वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशीप चांगली कामगिरी बजावलेल्या भारताची फुलराणी साईना नेहवाल हिने पुन्हा एकदा तिचे माजी गुरू पुल्लेला गोपीचंद याच्या अकादमीत प्रशिक्षण सुरू केले असल्याचे सोमवारी ट्वीटरवरून जाहीर केले आहे. साईनाने यापूर्वी दोन वेळा कोच बदलले होते.

गोपीचंद यांच्यापासून गेली तीन वर्षे साईना दूर होती इतकेच नव्हे तर त्यांच्यात बोलणेही होत नव्हते. असे असले तरी दोघांनाही एकमेकांबद्दल खूपच आदर होता. बंगलोर मध्ये सप्टेंबर २०१४ मध्ये साईनाने विमलकुमार यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा खेळ सुधारला. ती वर्ल्ड नंबर वन खेळाडू बनली. दोन वर्ल्ड चँपियनशीप मध्ये तिने मेडल्स मिळविली. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलिंपिक मध्ये कांस्य पदक पटकविणारी ती पहिली महिला बॅहमिंटनपटू ठरली होती.

२०१० च्या कॉमनवेल्थ गेम्सनंतर तिने गोपीचंद यांचे मार्गदर्शन बंद करून भास्करबाबू यांच्याकडे कोचिंग सुरू केले होते. मात्र आता पुन्हा एकदा गोपीचंद यांच्याकडूनच मार्गदर्शन घेण्याचा निर्णय तिने घेतला आहे.