ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाकिस्तानने अपमान केल्याचा मुस्लिम क्रिकेटपटूचा आरोप

कराची, दि. ७ (वृत्तसंस्था) - पाकिस्तानमध्ये तब्बल आठ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होत आहे. पाकिस्तानचा संघ पुढील महिन्यात विश्व एकादश संघाविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र त्यापूर्वीच पाकिस्तानच्या वृत्तीवर टीका होत असून पाकिस्तानी उच्चायोगाने अपमान केल्याचा आरोप एका मुस्लिम क्रिकेटपटूनेच केला आहे.

विश्व एकादश संघात असलेल्या पाकिस्तानी मूळ असलेल्या दक्षिण आफ्रीकी क्रिकेटपटू इमरान ताहिर याने हा आरोप केला आहे. पाकिस्तानी उच्चायोगाने अपमान करून मला हाकलून दिले, अशी तक्रार त्याने केली आहे.

लेग-स्पिनर असलेल्या ताहिर याने ट्वीटरवरून आपल्या दुःखाला वाट करून दिली आहे. ताहिरच्या म्हणण्यानुसार तो व्हिसा घेण्यासाठी त्याच्या कुटुंबासह पाकिस्तानी उच्चायोगात गेला होता. मात्र उच्चायोगाने मला तास खोळंबून ठेवले आणि तेथील कर्मचाऱ्यांनी माझ्याशी उद्धट वर्तन केले, असा दावा ताहिरने केला आहे. मात्र पाकिस्तानचे उच्चायुक्त इब्न--अब्बास यांनी मला मदत केली, असेही त्याने म्हटले आहे.

विश्व एकादश संघ पाकिस्तानविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याला इंडिपेंडेन्स कप असे नाव देण्यात आले आहे. येत्या १२, १३ और १५ सप्टेंबर रोजी हे सामने होणार आहेत. दक्षिण आफ्रीकेचा फाफ डु प्लेसिस हा विश्व एकादश संघाचे नेतृत्व करणार आहे.