ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाच्या सामन्याला जीएसटीचा फटका

नवी दिल्ली, दि. ८ (वृत्तसंस्था) - श्रीलंका दौऱ्यानंतर येत्या १७ सप्टेंबरपासून चेन्नईच्या मैदानातून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. तामिळनाडू क्रिकेट मंडळाने परिपत्रकाद्वारे या सामन्यासाठीच्या तिकीट दरासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. या माहितीनुसार १२०० रुपयांपासून ते ८००० रुपयांपर्यंत तिकीट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नईच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. ही तिकिटे विक्रीसाठी १० सप्टेंबरपासून उपलब्ध करण्यात येणार असून www.bookmyshow.com या संकेतस्थळावरुनही क्रिकेट चाहत्यांना तिकिट बूक करता येतील. पाहुण्यांसाठीचे खास तिकीट १२ हजार रुपये एवढे आहे. वस्तू सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यामुळे तिकीट दरामध्ये ४५० रुपये वाढ झाल्याचे तामिळनाडू क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.