ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

औरंगाबादमध्ये विवाहितेला जिवंत जाळले; पतीला अटक

औरंगाबाद, दि. ३१ (प्रतिनिधी) - दारूसाठी पैसे न दिल्याने एका मद्यपी पतीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण करीत घरात कोंडून जिवंत जाळले. त्यात गंभीररित्या भाजल्याने तिचा दुदैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दारूडय़ा पतीला अटक केली आहे.

सीमा अश्विन कुर्णे (वय १९, रा. मुकुंदनगर, औरंगाबाद) असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर तिचा पती अश्विन कुर्णे याला पोलिसांनी गजाआड केले आहे. रिक्षा चालक असलेला अश्विन आणि सीमा यांचा पाच महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. अश्विनला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी सीमाला मारहाण करीत असे.

२० डिसेंबरला त्याने सीमाकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने अश्विनने तिला बेदम मारहाण केली. मार वाचविण्यासाठी ती पळून जाऊ लागताच अश्विनने तिला फरफटत ओढूत घरात नेले आणि कोंडून ठेवले. त्यानंतर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. या घटनेत ती गंभीररित्या भाजली. शेजाऱ्यांनी तिला तातडीने घाटी रूग्णालयात दाखल केले. मृत्यूपूर्व पोलिसांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी अश्विनला अटक केली आहे.