ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

हिंगोली जिल्ह्यात जलयुक्तच्या दुसऱ्या टप्प्यात १०० गावांची निवड

हिंगोली, दि. ३१ (प्रतिनिधी) - ‘सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र - 2019` अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात सन 2015-16 मध्ये एकूण 707 गावांपैकी 124 गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली. तर सन 2016-17 मध्ये अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील 100 गावांची निवड करून या गावांमध्ये पुढील वर्षात जलसंधारणाची कामे करण्यास जिल्हास्तरीय अभियान समितीने मान्यता दिलेली आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली (28), कळमनुरी (25), सेनगाव (27), वसमत (05) व औंढा नागनाथ (15) या पाच तालुक्यातील 100 गावांची निवड करण्यात आलेली आहे. सदरची गावे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे :- हिंगोली तालुका - बोंडाळा, बोराळा, बोराळवाडी, पांगरी, साटंबा, वंजारवाडी, आडगांव, वैजापूर, चोरजवळा, पारोळा, आठरवाडी, ब्रम्हपूरी, चिंचाळा, इंचा, कानडखेडा खु., नर्सी ना., पेडगांववाडी, पेडगांव जुमडा, खानापूर चित्ता, कनका, भटसांगवी, भटसांगवी तांडा, लासीना, दुर्गसावंगी, डिग्रसवाणी, पिंपळदरी, काळकोंडी, भिरडा. कळमनुरी तालुका - खरवड, शिवणी खु., उमरा, कोपरवाडी, जरोडा, तुप्पा, मसोड, बउर, असोलवाडी, माळधावंडा, उमदरवाडी, म्हैसगव्हाण, रामेश्वर तांडा, सोडेगाव, रेणापूर, वारंगा त. नांदापूर, चाफनाथ, जांभरून, मुढंळ, नवखा, हरवाडी, महारी बु., झरा, मोरवड, झुनझुनवाडी. औंढा नागनाथ तालुका - रुपूर, दुरचुना, ढेगज, नंदगाव, भोसी, गोजेगाव, रांजाळा, मुर्तिजापूर सावंगी, सिरला तांडा, जोडपिंपरी, नागेशवाडी, लोहरा खु., चोंढी शहापूर, पुर, काकडदाभा. वसमत तालुका - मरसूळ, वापटी, गुंडा ( करंजी ), बोरीसावंत, रेऊळगाव. सेनगाव तालुका - उटी ब्र., खुडज, पुसेगाव, पानकन्हेरगाव, हनकदरी, कोळसा, सुकळी बु., भानखेडा, हिवरखेडा, चिखलागार, कापडसिंगी, बरडा, गोरेगाव, सवना, माझोड, केंद्रा बु., कडोळी, हताळा, जामठी बु., पळशी, बाभुळगाव, जवळा बु., डोंगरगाव, कारेगाव, वाढोना, दाताडा बु., दाताडा खु. 

जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 29 डिसेंबर, 2015 रोजी झालेल्या जिल्हा अभियान समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष व उपस्थित सर्व सदस्यांनी सन 2016-17 मध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जिल्ह्यातील 100 गावांच्या निवडीस मान्यता दिली. सदरची गावे ही शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे निवडण्यात आलेली आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी पवार यांनी दिली.