ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पहिली ते तिसरीतील मुलींशी शिक्षकाचे अश्लिल चाळे

धारूर, दि. २ (प्रतिनिधी) - अंबाजोगाई तालुक्यातील आणि धारूर ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या केंद्रेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अनंत गायकवाड याने तिसरीतील मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार पालकांच्या जागरूकतेने गुरुवारी समोर आल्यानंतर त्याच्यावर धारूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गायकवाडच्या कुकर्माच्या कहाण्या समोर येत असून दीड वर्षापासून अनंत गायकवाड विद्यार्थिनींबरोबर अश्लील चाळे करत असल्याची माहिती समोर आली आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या केंद्रेवाडी जिल्हा परिषद शाळेत १५७ विद्यार्थी शिक्षण घेत असून शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत. 

अनंत गायकवाड हा शिक्षक नऊ वर्षांपासून कार्यरत आहे. मागील दीड वर्षापासून गायकवाड हा पहिली ते तिसरीपर्यंतच्या अनेक मुलींबरोबर अश्लील चाळे करत असल्याची चर्चा शाळेत सुरू होती. या प्रकाराची माहिती मुख्याध्यापकासह शाळेतील सर्व शिक्षकांना होती. परंतु थेट गायकवाड याला समज देण्याची हिंमत तेव्हा शाळा प्रशासनाने दाखवली नाही की शाळेतील शिक्षकाकडून असा प्रकार होत असल्याचेही तेव्हा शाळा प्रशासनाने वरिष्ठांना कळवले नाही. त्यामुळे गायकवाडचे फावले आणि दिवसेंदिवस हा प्रकार वाढत गेला.

शाळेतील विद्यार्थिनींबरोबर असा प्रकार होत असल्याची माहिती एका मुलीने आपल्या आजीला दिल्यानंतर या आजीने गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक, महिला यांच्या कानावर घातला. गुरुवारी गावकऱ्यांनी शाळेत जाऊन शिक्षकाचा प्रकार समोर आणला. या वेळी मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर अधिकारी केंद्रेवाडीमध्ये धडकले.

अखेर ३१ डिसेंबर रोजी धारूर ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंदण्यात आला. शुक्रवारी अनंत गायकवाड याला धारूर पोलिसांनी माजलगाव न्यायालयात हजर केले असता न्या. मोराळे यांनी गायकवाडला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.