ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चंद्रकांत खैरेंची मुलीच्या लग्नात कोट्यवधींची उधळपट्टी

औरंगाबाद, दि. ५ (प्रतिनिधी) - औरंगाबादमधील शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांची मुलगी प्रेरणा खैरे हिचा विवाह सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. 

प्रेरणा खैरे यांचा विवाह कर्नाटकातील धारवाडच्या बसवराज आरळकट्टी यांच्याशी झाला आहे. बसवराज यांचं बीईपर्यंत शिक्षण झालं आहे. टीसीएस या कंपनीचे ते सहाय्यक सल्लागार आहेत. मात्र, खैरेंनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली आहे.

काही वर्षांपूर्वी भास्कर जाधव यांच्या मुलाच्या लग्नात अशीच डोळे दिपवणारी उधळपट्टी झाली होती. विशेष म्हणजे जाधवांच्या लग्नात ज्या नम्रता केटरर्सनं व्यवस्था केली होती. त्यांचीच व्यवस्था खैरेंच्या मुलीच्या लग्नात होती.

काल संगीत रजनीच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे, रामदास कदम, सुभाष देसाईंनी हजेरी लावली. आजच्या विवाह सोहळ्यालाही दिग्गजांची उपस्थिती होती.

एकीकडे मराठवाड्यात जवळपास ८०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अशावेळी लग्नासाठी ही उधळपट्टी शिवसेना नेत्यांना शोभते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी वणवण फिरत असताना त्यांच्याच पक्षाचे एक खासदार मुलीच्या लग्नात लाखो रुपये खर्च करत असल्याचा विरोधभास दिसत आहे.