ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नाम फाऊंडेशनने केले २३ मुलींचे कन्यादान

बीड, दि. ८ (प्रतिनिधी) – नाम फाऊंडेशनच्या वतीने २३ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. यावेळी बीडकरांशी नाना पाटेकर यांनी संवाद साधताना बाप आणि भावाच्या भूमिकेतून आम्ही कन्यादानासाठी आलो आहोत. या विवाहापासून महाराष्ट्रातील सर्वांनी प्रेरीत व्हावे. आज खरोखर मी धन्य झालो आणि श्रीमंत झालो. कारण एकाचवेळी एवढ्या लेकी आणि एवढे जावई मिळाले, आणखी कोणती श्रीमंती पाहिजे. मकरंद भावाच्या तर मी बापाच्या भूमिकेतून येथे आलो आहे असे सांगत बीडकरांची मने जिंकली.

बीडचा भूमीपूत्र मकरंद अनासपुरे म्हणाला की, विवाहबध्द झालेल्या नवरदेवांनो, पत्नीला त्रास देऊ नका, सुखाचा संसार करा, असे सांगत मकरंदने उपस्थितात हशा पिकवला. यावेळी दोन्ही अभिनेत्यांनी नवविवाहित जोडप्यांना शुभाशिर्वाद दिले. 

हजारो वर्‍हाडी मंडळीच्या उपस्थितीने खचाखच भरलेला सभामंडप, सनई-चौघड्यांचा निनाद, कन्यादानासाठी उपस्थित असलेले प्रसिध्द सिने अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे, ब्रह्मवृंदांकडून झालेला कुर्यात सदा मंगलमचा जयघोष आणि हजारो वर्‍हाडींनी दिलेले शुभाशिर्वाद अशा उत्साहपूर्ण वातावरण हा सामूदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी नाम फाऊंडेशनच्या वतीने विवाहित जोडप्यांना प्रत्येकी दहा हजाराचे संसारोपयोगी साहित्य आणि १५ हजाराचा धनादेश देण्यात आला.