ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शनिमंदिराच्या ४०० वर्षांच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपदी महिला

अहमदनगर, दि. ११ (प्रतिनिधी) - शनी शिंगणापूरमध्ये ४०० वर्षांच्या  इतिहासात प्रथमच चमत्कार घडला आहे. शनीशिंगणापूर देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड झाली आहे. अनिता शेटे आता अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. तर उपाध्यक्षपदी नानासाहेब बानकर यांची निवड झाली आहे.

महिलांच्या चौथऱ्याच्या प्रवेशावरून वाद ओढावल्याने शनी शिंगणापूर देवस्थान देशभरात चर्चेत आलं होतं. गेल्या महिन्यात एका महिलेनं बंदी असतानाही शनीच्या चौथऱ्यावर प्रवेश केला होता. त्यानंतर पावित्र्य भंग झाल्याचा दावा करून पुजाऱ्यांनी शनीच्या शीळेवर अभिषेक घातला होता. महिलांना दिल्या जाणाऱ्या हीन वागणुकीमुळे राज्यभरातून मंदिर प्रशासनावर टीकेची झोड उठली होती.

त्याच पार्श्वभूमीवर झालेल्या विश्वस्तपदाच्या निवडणुकीमध्ये दोन महिलांनी अर्ज भरले होते. यंदा प्रथमच अनिता शेटे आणि शालीनी लांडे या दोन महिलांची विश्वस्तपदी निवड झाली होती. निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर आज अध्यक्षपदावरही अनिता शेटे यांची निवड झाली आहे.

दरम्यान आता नव्या अध्यक्ष चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाची मुभा देणार का याकडे अवघ्या भक्तांचं लक्ष लागलं आहे. पण नियोजित अध्यक्षांनी मध्यंतरी एका वृत्तपत्राला मुलाखत देऊन, आपण परंपरांचा आदर केला पाहिजे असं म्हणत, आपल्या भूमिकेची कल्पना दिली होती.