ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी नागेश माने

लातूर, दि. २१ (प्रतिनिधी) - शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांत फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा प्रमुखपदी ॲडव्होकेट नागेश माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांना मात्र कायम ठेवण्यात आले आहे. 

शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून गेल्या वर्षी संजय सावंत येथे आले. येथे आल्यानंतर तातडीने त्यांनी त्यावेळेस जिल्हा प्रमुख पप्पू कुलकर्णी व सुभाष काटे यांची उचलबांगडी केली. त्यांच्या इच्छेने जिल्हा प्रमुखपदी बालाजी भोसले व संतोष सोमवंशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. यांच्या नियुक्‍तीला एक वर्षही झालेले नाही.

दरम्यानच्या काळात श्री. भोसले यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबईत मंगळवारी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांत फेरबदल केले आहेत. यात श्री. भोसले यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी जिल्हा प्रमुख म्हणून  नागेश माने यांची वर्णी लावली आहे. त्यांच्याकडे लातूर शहर, अहमदपूर व उदगीर हे तीन विधानसभा मतदारसंघ राहणार आहेत. 

तर विद्यमान जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांना कायम ठेवण्यात आले असून त्यांच्याकडे लातूर ग्रामीण, औसा व निलंगा हे तीन विधानसभा मतदार संघ राहणार आहेत. तसेच माजी जिल्हा प्रमुख व पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बळवंत जाधव यांची जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख म्हणून तसेच नगरसेवक रवी सुडे यांची महापालिका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.