ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारत माता की जय कधीच म्हणणार नाही - ओवेसी

लातूर, दि. १४ (प्रतिनिधी) - नेहमी वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. लातूर जिल्ह्यातील एका गावात बोलताना ते म्हणाले की, मी भारत माता की जय कधीच म्हणणार नाही. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा असंतोष उफाळून येणार आहे.

सभेला उपस्थित असलेल्या नागरिकांना संबोधताना ते म्हणाले की, भारतात राहीन पण भारत माता की जय म्हणणार नाही. हवे तर माझ्या गळ्याला चाकू लावा, तरीही मी भारत माता की जय म्हणणार नाही. तसे स्वातंत्र्य मला संविधानाने दिले आहे. कारण आमच्या संविधानामध्ये भारत माता की जय म्हणणे जरूरी आहे, असे कुठेही लिहिलेले नाही. मी संविधानाचा सन्मान करतो आणि करीत राहीन.

ओवेसीच्या या वक्तव्यानंतर भाजप, शिवसेना भडकली आहे. भाजपचे नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे अल्ला ओवैसीला सद्‌बुद्धी दे अशी आम्ही प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन ओवैसींच्या भाषणाची दखल घेतील व त्याबाबत तपास करतील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेऊन कोणी बेजबाबदार वक्तव्ये करू शकत नाही.

पर्यावरण मंत्री व शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ओवैसींच्या विधानावर कडवट टीका केली आहे. भारत माता की जय म्हणावयाचे नसेल तर त्यांनी पाकिस्तानला चालते व्हावे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून कडक कारवाई करावी. या हिरव्या सापाला कोणी दूध पाजू नये.

ओवैसींच्या विधानावर समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांनीही टीका केली आहे. ते म्हणाले की, आम्ही भारतात राहतो तर भारत माता की जय म्हणण्यात काहीच वाईट नाही. ओवैसी या मुद्द्यावरून राजकारण करीत आहेत.