ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लातूरकरांना रेल्वेने पाणी..?

लातूर, दि. २२ (प्रतिनीधी) - उजनी धरणातील पाणी पंढरपूर येथून घेऊन रेल्वेद्वारे ते लातूर शहराला पुरवण्याची शक्यता रेल्वे विभाग आजमावून पहात आहे, अशी माहिती काल कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी मुंबई येथे विधानभवनात पत्रकारांशी बोलताना दिली. लातूर शहरात आजमितीस ४०,००० हातपंप असून यापैकी निम्मे हातपंप कोरडे पडले आहेत. लातूर शहराच्या ३५ किमीच्या परिसरात पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत. या ठिकाणी टँकर्समध्ये पाणी भरतेवेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ होत असल्यामुळेच कलम १४४ लागू करावे लागले,असेही खडसे म्हणाले.

लातूर शहराला रेल्वे टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या बाबतीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी मी अलीकडेच चर्चा केली असल्याचे सांगत खडसे या वेळी म्हणाले, उजनी धरणातील राखीव पाणीपुरवठा भीमा नदीत सोडून तो पंढरपूरला आणणे व पंढरपूर येथून रेल्वे टँकर्समध्ये भरून लातूरला नेणे, लातूर शहराजवळील हरंगूळ येथे ते उतरवणे व शहराला पाणीपुरवठा करणे शक्य आहे का, हे रेल्वेमंत्री अधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा करून अजमावून पहाणार आहोत. शिवाय रेल्वेकडे पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी विशिष्ट टँकर्स उपलब्ध नाहीत. त्यासाठी दूध वाहतुकीचे टँकर्स अधिग्रहित करावे लागतील. 

पंढरपूर येथे या टँकर्समध्ये पाणी भरण्याची मोठ्या प्रमाणात व्यवस्था निर्माण करावी लागेल. हरंगूळ-लातूर येथे रेल्वेची फक्त एकच मार्गिका असल्याने तेथे पाणीपुरवठ्याचे रेल्वे टँकर्स फार काळ उभे करून ठेवता येत नाहीत, त्यासाठी एक स्वतंत्र रेल्वे मार्ग तेथे टाकावा लागेल. एक टँकर पाणी भरून त्याची लातूरपर्यंत वाहतूक करण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. असे असले तरी लातूरकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी विनंती रेल्वेमंत्री महोदयांना आपण केली असल्याचे खडसे यांनी सांगितले. 

या संदर्भात राज्य शासनाचे व रेल्वेचे अधिकारी यांची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री महोदयांनी सांगितले, अशी माहितीही खडसे यांनी या प्रसंगी दिली.