ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पाणी पुरवठ्यावर देखरेख ठेवण्याचे उपजिल्हधिकाऱ्यांना आदेश

लातूर, दि. २४ (प्रतिनीधी) - यावर्षी राज्यात तसेच जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे लातूर शहराला टँकरद्वारे पाणी पूरवठा करण्यात येत आहे. टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याऱ्या यंत्रणेवर देखरेख ठेवण्यासाठी व पाण्याचे योग्य वितरण करण्यासाठी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी उपजिल्हाधिकारी प्रकाश खपले, कमलाकर फड आणि उपविभागीय अधिकारी डॉ. प्रताप काळे यांची नियूक्ती केली आहे.

लातूर शहराला डोंगरगाव बॅरेज, निम्न तेरणा, भंडारवाडी तलाव या पाणीसाठ्यातील पाणी टँकरद्वारे पुरवले जाते. उपजिल्हाधिकाऱ्यांनी शहराला करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याची पाहणी करुन नागरिकांना पाण्याचे योग्य रितीने वितरण करण्याचे नियोजन केले आहे. तसेच शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेची पाहणी करुन मनपातील प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी टँकर भरणा स्थळी प्रत्यक्ष भेट देवून पाणी पुरवठ्याच्या परिस्थितीची पाहणी केली. 

उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश खपले यांनी काल निम्न तेरणा येथे प्रत्यक्ष भेट देवून पाण्याच्या उपलब्धतेची पाहणी केली. सद्यस्थितीत निम्न तेरणा मधुन निलंगा शहर, किल्लारी ३० खेडी योजना, उमरगा नगर पालिका आदींना पाणीपूरवठा करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच निम्न तेरणामधील पाण्याच्या होणाऱ्या बाष्पीभवनाचे नियोजन केल्यास एक महिना अधिक पाणी उपलब्ध होईल अशीही माहिती खपले यांनी यावेळी दिली. 

तसेच लातूर शहरातील महात्मा गांधी चौक जलकुंभ टँकर भरणा पॉईंट, सरस्वती कॉलनी जलकुंभ टँकर भरणा पॉईंट आणि  अंबाजोगाई रोड (आर्वी) जलकुंभ टँकर भरणा पॉईंटवर देखील प्रत्यक्ष जाऊन श्री. खपले यांनी पाहणी केली. लातूर शहरास टँकरद्वारे पाणीपूरवठा करण्यासाठी मनपाने प्रभागनिहाय पाणी वाटपाचे नियोजन केले आहे. प्रभाग अधिकारी, ड्रायव्हर आदींचा तपशील टँकरवर लावण्याच्या तसेच पाणी पुरवठा कधी करण्यात येणार याच्या पूर्वसूचना नागरिकांना देण्याविषयी सूचना केल्या. यामुळे पाणी पूरवठा व्यवस्थित करणे शक्य होईल,