ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पनामा पेपर्सप्रकरणी खंडपीठात याचिका

औरंगाबाद, दि. ७ (प्रतिनिधी) - पनामा पेपर्सच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर झाली आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांनी या प्रकरणाची सुनावणी येत्या सोमवारी ठेवली आहे. 

पनामा या देशातील "मोझॅक फोन्सेका‘ या कायदेविषयक कंपनीशी संबंधित कोट्यवधी गुप्त कागदपत्रे उघड करण्यात शोधपत्रकारांना यश आले. यात पाचशे भारतीयांची नावे असल्याचे उघड झाले आहे. शिवाय विदेशांतील अनेकांचा सामवेश आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने निलंगा (जि. लातूर) येथील माजी आमदार माणिकराव जाधव यांनी ऍड. सतीश तळेकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली. 

याचिकेत अर्थ मंत्रालय, गृह मंत्रालय, सक्तवसुली संचालनालय (इडी) आदींना प्रतिवादी करण्यात आले आहे. खंडपीठाने याचिकाकर्त्यांना २५ हजार रुपये अनामत रक्कम भरण्यास सांगून यावर सोमवारी सुनावणी ठेवली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. सतीश तळेकर, ऍड. प्रज्ञा तळेकर हे काम पाहत आहेत.