ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लातुरात पोहोचली तिसरी पाणी एक्स्प्रेस

लातूर, दि. १५ (प्रतिनिधी) - भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईने होरपळलेल्या लातूरमध्ये आज तिसरी पाणी एक्स्प्रेस पोहोचली. यामुळे लातुरकारांना आतापर्यंत रेल्वेने 15 लाख पाणी मिळाले आहे.

दुष्काळग्रस्त लातुरकरांची तहान भागवण्यासाठी मंगळवारी आणि बुधवारी प्रत्येकी 5 लाख लिटर पाणी असलेली एक्स्प्रेस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आज (गुरूवारी) सकाळी 10.45 वाजता मिरजहून रवाना केलेली तिसरी पाणी एक्स्प्रेस लातूरमध्ये पोहोचली. या एक्स्प्रेसमधून 5 लाख लिटर पाणी लातुरकरांना मिळालं आहे.

सध्या रेल्वेच्या फलाटावर पाणी भरण्यात येत आहे. मिरज स्थानकावर रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून यार्डापर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे. ते काम लवकरच पूर्ण होईल. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर रविवारपासून एक्स्प्रेसला पाण्याचे 50 वॅगन जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.