ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

डॉ.आंबेडकरांनी पाणी, वीज आणि शेतीचा सुक्ष्म विचार केला होता - डॉ.लुलेकर

लातूर,दि. 19 (प्रतिनिधी) - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख आज केवळ दलितांचे कैवारी, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणुनच सांगितली जाते. परंतू डॉ. आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे कार्य केले असून, त्यांच्या समस्या सोडवून उपाययोजना करण्याकरीता पाणी, वीज आणि शेतीचा सुक्ष्म विचार केल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे माजी कुलसचिव तथा मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रल्हाद लुलेकर यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आयोजित मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील डीपीडीसी सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जंयती निमित्त आयोजित राजपत्रीत अधिकारी यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, उपजिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, सुनिल यादव, प्रदिप मरवाळे, पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण, विजय कबाडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय दाणे यांची उपस्थिती होती.

लुलेकर म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ग्रामीण समाजव्यवस्थेची जाण होती. तितकेच शेतीबद्दलही भान होते. शेतीचं चित्र बदललं पाहिजे, याबाबतही ते आग्रही होते. या देशात शेती, शेतकरी आणि शेतीशी संबंधीत समूहाचा विचार शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि शाहू महाराज आणि डॉ.आंबेडकर यांनीच केला आहे. अवघे 27 वर्षे वयात डॉ.आंबेडकरांनी देशातील शेती आणि शेतकरी यांचे संशोधन करुन ‘लहान शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय’ हा शोध निबंध लिहिला. शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे त्यांनी ब्रिटीश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. 

शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी समृद्ध झाला तर शेतीशी निगडित सर्व घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल असे त्यांचे मत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चिंतन करणाऱ्या, विचार मांडणाऱ्या आणि त्यांच्यासाठी चळवळी उभ्या करुन या देशातील शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न डॉ.आंबेडकरांना संपवयाचे होते. यासाठी त्यांनी 25 हजार शेतकऱ्यांचा देशातील पहिला मोर्चा काढला होता. एवढेच नाही तर त्यांच्या नेतृत्वात 7 वर्षे दिर्घकाळ शेतकऱ्यांचा संप झाला होता. जाती विसरुन सर्वजण एकत्र आल्यास देश तुमच्या हातात येईल असे सांगितले. खोती पद्धतीच्या विरोधात त्यांनी लढा दिला. देशाचे पहिले पाटबंधारे मंत्री झाल्या नंतर डॉ.आंबेडकर यांनी शेती आणि शेतकरी यांच्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. तसेच देशाचे पहिले ऊर्जा मंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिला ऊर्जा आयोग स्थापन करत वीज आणि पाण्याचे नियोजन केले. उद्योगांना वीज देतांना कृषी उद्योगांचा प्राधान्य दिले. डॉ.आंबेडकर यांच्यामुळे देशातील स्त्रीयांना मताचा व समतेचा अधिकार मिळाला, कामगारांना न्याय मिळवून देवून त्यांना सशक्त बनवले. डॉ.आंबेडकर हे सर्व देशाचे नेते होते. त्यांच्या विचारानुसार अनुकरण करणे हे महत्त्वाचे असल्याचे डॉ.लुलेकर यावेळी म्हणाले. 

समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय दाणे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. तर योगिराज माने यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील राजपत्रीत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.