ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बीडमध्ये पाण्याने घेतला चिमुकलीचा जिव

बीड, दि. २० (प्रतिनिधी) – मराठवाड्यात पाण्याची प्रंचड टंचाई असून त्यामुळे आणखी एक बळी गेला आहे. दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील साबळखेड गावात पाण्यासाठी हातपंपावर सतत फेर्‍या मारल्यामुळे 12 वर्षाच्या मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाला. 

शाळेला सुट्टी असल्यामुळे पाणी वाहून आणण्यासाठी घरच्यांना योगिता देसाई ही शाळकरी मुलगी मदत करत होती. घराजवळच्या हातपंपावरून पाण्यासाठी तिने अनेक फेर्‍या मारल्या होत्या.

बीड जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तिथल्या लोकांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावं लागत आहे. या गावातील पाचवीत शिकणारी योगिता पाणी आणण्यासाठी घरच्यांना मदत करत होती. भर उन्हात ती घराजवळच असलेल्या हातपंपावरून पाणी वाहून नेत होती. पाण्यासाठी वारंवार फेर्‍या मारल्याने ती चक्कर येऊन पडली. 

बेशुद्ध झालेल्या या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्याने शासकीय पातळीवर याची कुठे हि नोंद नाही.