ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

लातूरकरांना जलराणीमुळे मिळाले ६५ लाख लिटर पाणी

लातूर, दि. २० (प्रतिनिधी) - पन्नास वॅगनच्या रेल्वेतून पाणी घेऊन निघालेली ‘जलराणी’ आज (बुधवारी) सकाळी साधारण आठच्या सुमारास लातूरला पोहोचली. रेल्वेने पाणीपुरवठ्याची आजची नववी खेप असून यातून एकूण २५ लाख लिटर पाणी लातूरमध्ये पोचलं आहे. तर लातूरला आतापर्यंत रेल्वेने ६५ लाख लिटर पाणी मिळालं आहे.

एकाच वेळी रेल्वेने एखाद्या शहरासाठी २५ लाख लिटर पाणी देण्याची ही देशातील पहिलच वेळ आहे. या पुढे दररोज ५० वॅगनने शहराला रेल्वेने पाणी पुरवठा केला जाणार आहे. या रेल्वेतून आलेले पाणी रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या एका विहिरीत उतरवून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ते पाणी १५ टँकरद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नेण्यात येत आहे.

दरम्यान, दुष्काळग्रस्त लातूरला दिलेल्या मुदतीत पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन गेल्या काही दिवसांपासून कमालीचे प्रयत्न करत होते. सरकारी कामांचा अनुभव घेता रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी किमान १८ महिन्यांचा अवधी लागला असता. मात्र रेल्वेमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी लक्ष घातल्याने १८ महिन्यांचे काम अवघ्या ९ दिवसांत पूर्ण करण्याची किमया साधली आहे.