ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दारू कंपन्यांच्या पाण्यामध्ये कपात करण्याचे कोर्टाचे आदेश

औरंगाबाद, दि. २६ (प्रतिनिधी) - दुष्काळात दारु कंपन्यांना भरमसाठ पाणी पुरवठा  होत असून कंपन्यांचे पाणी दुष्काळ ग्रस्तभागाला देण्यात यावे हा प्रश्न प्रसारमाध्यमांनी लावून धरला होता. अखेर या प्रकरणाची कोर्टाने दखल घेऊन दारू कंपन्यांना होणाऱ्या पाण्यामध्ये कपात  करण्याचे आदेश दिले.

हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला पाणीकपातीचे आदेश दिले आहेत. येत्या १० तारखेपर्यंत दारु कपंन्यांच्या पाणीपुरवठ्यात ६० टक्के तर इतर उद्योगांच्या पाण्यात २५ टक्के कपात करा, असं खंडपीठाने म्हटलं आहे. खंडपीठाअतंर्गत येणाऱ्या 13 जिल्ह्यासाठी हा निर्णय लागू असेल. 

लोकांना पाणी दिसेनासं झालेलं असताना दारु कंपन्यांना २४ तास पाणीपुऱवठा केला जात होता. केवळ दारु कंपन्यांकडून मिळणाऱ्या महसूलापोटी सरकार याकडे कानाडोळा करत होतं. याचिकाकर्त्यांनी न्यायालयीन लढाई सुरु केल्यानंतर, या लढ्याला यश आलं आहे.