ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लक्झरी बस व टमटममध्ये भिषण अपघात; सहा ठार दोन जखमी

अहमदनगर, दि. २९ (प्रतिनिधी) -  जामखेडपासून जवळपास ८ की मी अंतरावरील पोखरी जवळील पांढरी पोल फॅक्टरी येथे लक्झरी बस व टमटम यांच्यात भीषण अपघात पहाटे चार वाजता झाला. या अपघातात ६ जण जागीच ठार झालेत. तर दोघे जखमी झालेत. त्याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अरुण लक्ष्मण गायकवाड, बंदू बाबूराव जोगदंड, राजू बन्सी खलसे, निर्जला अरुण गायवाड, आदित्य राजू खलसे (६ महिने), केसरबाई बंडू जोगदंड अशी मृतांची नावे आहेत. तर मनिषा राजू खलसे (२३) या गंभीर जखमी आहेत. त्यांना सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. तर तेजस अरुण गायकवाड (१२) हा किरकोळ जखमी असून त्याच्यावरही उपचार सुरु आहेत.

अपघातग्रस्त मराठवाडयातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील आहेत. मृत हे एकाच कुंटुबातील असल्याचे समजते. कामाच्या शोधासाठी पुण्याला स्थलांतरीत होत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.